झटपट पिझ्झा ऊत्तपम..
काही विषेश अवघड नाही एकदम सोप्पा आहे बनवायला ...
काल संध्याकाळी माझी काही मित्रमंडळी येणार होती म्हणून ईडली सांबरचा प्रोग्रॅम केला होता. फ्रिजमध्ये त्याचे पीठ शिल्लक उरले
होतेच. मग आज सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन फ्रीज मधे ठेवलेल पिठ बाहेर काढलं आणि त्याच पिठांत फ्रिजमध्ये उपलब्ध होत्या त्या सगळ्या भाज्या बारीक चिरून टाकल्या. भाज्या म्हणजे सिमला मिरच्या ,कोबी,फ्लॉवरचे तुरे ,कांदा ,टोमॅटो ई. मग त्यातच थोडी ठेचलेली मिरची , मीठ ,मीर पूड सगळ मिक्स केलं आणि दोन्हीही बाजूंनी तेल टाकून लाल सर रंगावर भाजून घेतलं .... वरून मग फक्त रेड चीली फ्लेक्स टाकायची . खातांना वरून परत ओरेगँनो टाकून खायच खूपच मस्त लागतं. सोबत दहयातली ओले खोबरे व पंढरपूरी डाळ्याची चटणी . असा हा झटपट
पिझ्झा उत्तपम ...
No comments:
Post a Comment