Wednesday 7 August 2019

ऐरोळ्या

#ऐरोळ्या


साहित्य : एक वाटी बेसन पीठ , एक वाटी कणीक (गव्हाचे पीठ) , दीड वाटी पिठीसाखर, एक छोटा चमचा वेलची पूड , दोन चमचे तूप मोहनाकरता, चिमूटभर खायचा सोडा, तळण्यास आवश्यकतेनुसार वनस्पती तूप.
कृती : एका बाउलमध्ये बेसन आणि कणीक (गव्हाचे पीठ) एकत्र करावे, त्यात पिठीसाखर, वेलचीची पूड, चवीपुरते मीठ, दोन चमचे तूपाचे मोहन घालून पीठ नीट कालवावे व पाणी घालून भज्याच्या पिठाइतके सरसरीत बनवावे. कढईत वनस्पती तूप घालून ही गोड भजी तळावी.
ह्या गोड भज्यात काजूचे तुकडे, खिसमिस, ओलें खोबरे घातल्यास भजी फारच चविष्ट लागतात. ही भजी आयत्या करता येतात व चवीला पण छान लागतात.

No comments:

Post a Comment