(गजानन महाराजांच्या प्रकट दिना साठी खास केला जाणारा)
साहित्य : दोन
वाट्या बेसन (चणा डाळीचे पीठ) , अर्धी वाटी शेंगाण्याचे
तेल , ८-१० कढीपत्त्याची पाने,चवीनुसार मीठ
आवडीनुसार लाल
मिरचीचे तिखट,फोडणी साठी एक चमचा मोहरी,एक छोटा चमचा हिंग,
अर्धा चमचा हळद,अर्धी मूठ बारीक
चिरलेली कोथिंबीर आणि अर्धी वाटी पाणी.
कृती : प्रथम गॅसवर एका कढईत तेल घालून ते छान गरम
झाल्यावर त्यात मोहरी घाला. ती तडतडल्यानंतर त्यात हिंग हळद घाला नंतर कढीपत्त्याची
पाने घाला . आता त्यात बेसनाचे पीठ घालून चांगले खमंग परतुन घ्या. नंतर त्यात आवडीनुसार
लाल मिरचीचे तिखट व चवीनुसार मीठ घालून थोडे परता . शेवटी त्यावर पाण्याचा हबका मारून बारीक चिरलेली
कोथिंबीर घाला आणि कढईवर झाकण ठेवून चांगली वाफ आणा आणि भाकरी बरोबर हा गजानन
महाराजांचा प्रसाद सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment