डाळ भुर्जी कोरडे पिठलं
साहित्य : दोन वाट्या चणाडाळ , चवीनुसार १० ते १२
हिरव्या मिरच्या,५-६ कांदे,चवीनुसार मीठ,१०-१२ कढीपत्त्याची पाने,एक चमचा जिरे ,१२-१५ लसूण पाकळया,मूठभर कोथींबीर ,चिमुटभर हिंग,चिमुटभर
हळद,फोडणीसाठी तेल.
कृती : प्रथम चार तास चणाडाळ पाण्यात भिजत घाला .
पाण्यातून उपसून काढून मिक्सरवर ती वाटताना हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, लसूण पाकळ्या घालून
पाणी न घालता भरडसर वाटा.
मग ती भरडसर वाटलेली डाळ चाळणीला तेल लावून थापा.
नंतर एका भांडयात दोन वाट्या पाणी ओता आणि वर वाटली
डाळ थापलेली चाळणी ठेवून झाकण ठेवा आणि ५-७
मिनिटे ती उकडा.
थंड झाल्यावर बाहेर
काढून ती उकडलेली डाळ हाताने फोडा/कुस्करा.
गॅसवर एका कढईत फोडणीसाठी
आवश्यक तेवढ तेल गरम करून त्यात जीरे , कढीपत्ता आणि थोड़ी हिरवी मिरची तुकडे करून घाला. ते परतल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा
परता. मग त्यात हिंग, हळद घाला.
शेवटी त्यात कुस्करलेली
डाळ घालून परता आणि झाकण ठेउन एक वाफ काढा.वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही
डाळ भुर्जी-कोरडे पिठले भाकरी किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment