उपासाचे दहिवडे
साहित्य : दोन उकडलेले
बटाटे, एक वाटी साबूदाणा पीठ,
दोन वाट्या वरीच पीठ,चवीनुसार हिरवी
मिरची, दोन वाट्या दही ,तळणीसाठी तूप. चवीनुसार सैंधव मीठ, जीरे व लिंबूरस, ,अर्धी मूठ चिरलेली कोथिंबीर,दोन वाट्या दही,
चिमूटभर काळी मिरी पूड,तळणीसाठी तूप.
कृती : बटाटे उकडून
घ्या व साले काढून कुस्करून घ्या.त्यात साबूदाण्याचे पीठ,सैंधव मीठ आणि
चिरलेली कोथिंबीर घालून वड्यांसाठी पीठ भिजवून ठेवा.
एका बाउलमध्ये तीन
वाट्या दही घ्या. दहयात एक छोटा चमचा जिरे पूड,एक चमचा साखर,चिमूटभर काळी मिरी
पूड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून ठेवा.
आता गॅसवर एका
पॅनमध्ये तूप गरम करा. भिजवलेल्या पिठाचे लिंबाएव्हढे गोळे बनवून ठेवा. त्यातील
एकेक गोळा हाताला पाणी लावून हातावर घ्या आणि त्याला वड्याचा आकार देवून चपटा करा
आणि तापलेल्या तुपात सोडा. सागलीकडून गोल्डन ब्राऊन रंगावर तळूनकाढा. वडे थोडेसे
थंड झाल्यावर बाउलमध्ये बनवून ठेवलेल्या दहयात हे वडे घालून ठेवा.
सर्व्ह करतेवेळी
सर्व्हिंग बाउलमध्ये हे वडे काढल्यावर वर चिलेल्या कोथिंबीरीने सजावट करा आणि मग
सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment