#कारळयाची #चटणी
साहित्य : एक वाटीभर कारळे,एक वाटी सुक्या गोटा खोबर्यावचा कीस,एक वाटी भट्टीवर भाजलेले शेंगददाणे,७-८ लसूण पाकळया,चवीनुसार ८-१० लाल सुक्या मिरच्या,चिंचेचे बुटुक,चवीनुसार मीठ,साखर.
कृती : गॅसवर एका पॅनमध्ये मंद आंचेवर कारळे चांगले खमंग भाजून घ्यावे.(चांगले भाजले गेले की त्याला चकाकी येते) सुकया गोटा खोबर्याचा कीस आणि लाल सुक्या मिराच्याही भाजून घ्याव्या.इतर सर्व साहित्य त्यात मिक्स करून मिक्सरवर चटणी वाटून किंवा खलबत्यात कुटावी.
No comments:
Post a Comment