Saturday 4 August 2018

#अळीवाचे #लाडू


#अळीवाचे #लाडू 


आळीव निवडुन घ्यावेत करण बरेचादा त्यात कचकच असु शकते
मग ते चार पाच तास नारळाच्या पाण्यातच भिजत घालावेत. (नारळाचे पाणी कमी पडत असेल तर थोडं दुध घातले तरी चालेल)
मधे मधे लक्ष द्यावं लागत करण जसजसे आ़ळीव फुगत जातात तसतसे त्यतले पाणी \दुध कमी होत जातं . मग थोड थोड अंदाजानी त्यात घालायचं.
मग ४\५ तासांनी त्यात नारळाचा भरपूर चव आणि किसलेला गु़ळ घालुन हलवुन तासभर ठेवायचं . मग गुळ छान विरघळला की हे मिश्रण एका फ्रायपॅन मध्ये गॅससवर ठेवा आणि सतत ढवळत रहा. आळीवाचा छान खमंग वास यायला लगतो तेंव्हा मिश्रण उतरवायच आणि त्यात जयफळ वेलची घालुन लाडु वळायचे.
टीप : यात गुळ अंदाजाने चव बघुन बघुन घालावा पण जास्त झाला तर लाडु छान नाही लागत.  
आळीव जर पुर्णपणे नारळाच्या पाण्यातच भिजवले असतील तर ते जास्त दिवस टिकतात पण जर दुध वापरलं असेल तर जरा कमी टिकतात.
आधी अगदी अर्धीवाटी अळीवाचेच लाडू करुन बघावेत  कारण अळीव भिजल्यावर खुपच फुगतात आणि वाढतात. खोबरं किती घालावं याचं तसं काही प्रमाण नाहीये पण भरपुर खोबर छानच लागत. अर्धी वाटी अळीवाला एक ते दिड नारळ वापरावा. जास्त वाटेल हे खोबरं ,पण छान लागतात.
आणि फीजमधे १५ दिवस टिकतात. अळीवाचे लाडू खाण्यापुर्वी तासभर आधी फ्रिजमधून बाहेर काढून ठेवावे.

विशेष टीप : यातील अळिव निवडणे हाच सगळ्यात जास्त जिकिरीचा / कटकटीचा व त्रासदायक भाग असतो.

No comments:

Post a Comment