इडली पोहा भुर्जी
साहित्य : आदल्या दिवशीच्या उरलेल्या इडल्या-३ ते ४, एक वाटी
जाड पोहे,एक मध्यम आकाराचा कांदा -बारीक चिरून, एक छोटा टोमॅटो-बारीक चिरून, एक चमचा – आले-लसूण पेस्ट, फोडणीसाठी एक चमचा जिरे
व मोहोरी, एक चमचा लाल मिरचीचे तिखट , अर्धा
चमचा धनेपूड , चवीनुसार मीठ , एक
टेबलस्पून तेल , सजावटीसाठी कोथिंबीर
कृती : प्रथम
पोहे धुवून घ्या व चाळणीत भिजत घालून ठेवा,तसेच इडल्या
हाताने नीट कुस्करून ठेवाव्यात.
मग गॅसवर एका काढईत फोडणीसाठी तेल
गरम करत ठेवावे तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी घालून दोन्ही चांगली तडतडल्यावर
त्यात कांदा घालून चांगला पारदर्शक होऊन गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतू द्यावा मग त्यात टोमॅटो घालून परतून घ्यावे
तसेच आलं-लसूण पेस्ट घालावी व परतून घ्यावे ,शेवटी
भिजत घातलेले पोहे घालून कलथ्याने चांगले खालीवर
हलवून मिक्स करावे. मग त्यात हळद,
धनेपूड, लाल मिरचीचे तिखट घालून पुन्हा चांगले
परतून घ्यावे आता यांत कुस्करलेल्या इडल्या घालाव्यात व नीट एकजीव करून घ्यावे.
इडलीत आधीचेच मीठ असते तेव्हा थोड बेतानेच मीठ घालावे व परतून घ्यावे साधारण ३ ते
४ मिनिटांत गॅस बंद करावा.
भुर्जीवर बारीक चिरलेली कोथिंबीर
घालून डिश सर्व्ह करावी.
No comments:
Post a Comment