Search This Blog

Monday, 6 August 2018

#अंबाडीच्या #देठांची #चटणी


#अंबाडीच्या #देठांची #चटणी

साहित्य : एक वाटीभरून पालेभाजी-आंबाडीची कोवळी देठे , एक टेबलस्पून पांढरे तीळ,पाव वाटी शेंगदाणे , दोन टेबलस्पून पंढरपूरी डाळे , चवीनुसार चार लाल सुक्या मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा, कढीपत्त्याची ५-६ पाने,चवीनुसार मीठ व साखर,अर्धी वाटी दही , बारीक चिरलेली कोथिंबीर , परतण्यासाठी व फोडणीसाठी जरुरीप्रमाणे तेल, फोडणीसाठी मोहरी,जिरे,हळद व हिंग
कृती : प्रथम अंबाडीची देठे जर जास्त लांब असतील तर कापून छोटी करून घ्या. गॅसवर एका नॉनस्टिक फ्राय पॅनमदये थोडेसे तेल घालून ते गरम झाल्यावर त्यान बारीक केलेली अंबाडीची देठे, शेंगदाणे , पंढरपूरी डाळे , चवीनुसार चार लाल सुक्या मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा, कढीपत्त्याची ५-६ पाने घालून चांगले परतून घ्या. आता चवीनुसार मीठ व साखर घालून पुन्हा एक मिनिट परतून घेऊन गॅस बंद करा. थंड झाल्यावर परतलेले सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घाला व अर्धी वाटी दही व चिरलेली कोथिंबीर घालून चटणी वाटून घ्या, गॅसवर एका कढल्यात फोड निसाठी थोडेसे तेल गरम घेऊन घेऊन त्यात मोही,जिरे,हळद व हिंग घालून फोडणी करून घ्या व त्यी या वाटलेल्या चटणीत घाला व कालवून घ्या.
सर्व्ह करतेवेळी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पोळी सोबत वाढा.

No comments:

Post a Comment