Search This Blog

Monday, 6 August 2018

#फोडणीचे खमंग #डोसे


फोडणीचे खमंग डोसे
साहित्य : एक वाटी तांदळाचे पिठ , अर्धी वाटी रवा , पाऊणवाटी दही , चवीपुरते मिठ , तडका फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल , एक  चमचा मोहरी , एक चमचा जीरे ,चवीनुसार दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे , ५-६ कढीपत्त्याची पाने.
कृती : प्रथम एका पातेल्यात तांदळाचे पिठ, रवा, दही व मिठ एकत्र करून घ्यावे.
डोश्याला लागेल एवढे पाणी टाकून पिठ पातळ करून ठेवावे.
गॅसवर एका मोठ्या कढल्यात तडका फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी व जिरे टाकून दोन्ही चांगले  तड तडल्यावर त्यात हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे , ५-६ कढीपत्त्याची पाने घालून २-३ मिनिटे चांगले परतून घावे आणि ही तडका फोडणी ह्या पातळ पिठावर टाकून १० मिनीटे झाकून ठेवावे.
आता नॉनस्टीक पॅनवर डोशाचे मिश्रण पसरवून दोन्ही बाजूने परतवून डोसे बनवून घ्यावेत.
हे डोसे चटणी/सॉस सोबत सर्व करा.
अधिक टिपा:
फोडणीमुळे ह्या डोश्यांना एक खास असा खमंगपणा येतो. लहानमुलांना असे खमंग डोसे खुप आवडतात.

दही थोडे आंबट असेल तर अजुन चांगले.

No comments:

Post a Comment