साहित्य : ८ नग ब्रेडचे स्लाइस,चार
वाट्या दही,एक चमचा साखर,एक चमचा जिरे,एक चमचा मोहरी,चिमूटभर हिंग,अर्धा चमचा सैंधव मीठ,अर्धा चमचा काळी मिरीपूड,एक
चमचा चाट मसाला,दोन टेबलस्पून तूप,५-६ कढीपत्त्याची पाने,सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर व बारीक शेव.
कृती : ब्रेड स्लाइसच्या कडा कापून काढून टाका,व
उरलेल्या मधल्या भागाचे सारख्या आकारात तुकडे कापून ठेवा.
गॅसवर एका पॅनमध्ये तूप गरम करून घेऊन त्यात हे ब्रेडचे कापलेले तुकडे
टाळून काढा व एका ताटात ठेवा.
आता एका बाउलमध्ये दही घेऊन ते चांगले फेटा. मग त्यात चवीनुसार साखर,सैंधव
मीठ,जिरे पूड, व काळी मिरीपुड घालून चमच्याने चांगले मिक्स करा.दही जास्त घट्ट
वाटले तरच थोडेसे पाणी घाला.
गॅसवर पॅन मध्ये तूप गरम करून घेऊन त्यात मोहरी व जिरे घालून ते
चांगले तडतडल्यावर त्यात कढीपत्त्याची पाने घाला परतून घ्या. ही खमंग फोडणी दह्यात
घालून बरोबर तळून ताटात ठेवलेले ब्रेडचे तुकडे घाल व एकदा चमच्याने हलकेच मिक्स
करा.
आता हा ब्रेड रायता सर्व्हिंग बाउल्समध्ये काढून घ्या व त्यावर लाल
तिखट,काळी मिरीपुड,जिरे पूड व चाट मसाला भुरभुरून वर बारीक शेव घालून त्यावर चिरलेल्या
कोथिंबीरीने सजावट करून सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment