Sunday 5 August 2018

#अळीवाची #खीर


अळीवाची खीर



साहित्य २५० मिलि लीटर पूर्ण स्निग्धांश असलेले दूध , दोन टेबलस्पून आळीव,७-८ बदाम,२-३ खारका,वाटीभर साखर,एक छोटा चमचा वेलकी पूड.
कृती : एका बाउलमध्ये वाटीभर दुधात अळीव रात्रीच भिजत घालून ठेवावेत म्हणजे सकाळी ते चांगले फुलून आलेले दिसतील. अळीवाप्रमाणेच  खारीक आणि बदामही रात्रीच दुधात भिजत घालून ठेवा,म्हणजे सकाळपर्यंत तेही चांगले भिजून फुगलेले व मऊ झालेले दिसतील. (उन्हाळ्यात दूध फाटण्याची शक्यता बरीच असते म्हणून अळीव,बदाम व खारका पाण्यात भिजत घालाव्यात)
सकाळी बदामाची साले काढून त्यांचे पातळ काप करुण ठेवावेत. खारकेच्या आतल्या  बीया  काढून खारकेचे बारीक बारीक तुकडे करुण ठेवावे.
गॅसवर एका पॅनमध्ये दूध गरम करावे आणि त्यात भिजवलेले अळीव घालावे. नंतर साखर, खारीकेचे बारीक तुकडे  आणि साले काढलेल्या बदामाचे  पातळ काप घालून मध्यम आचेवर ३-४ मिनीटे शिजवून घ्यावे. वेलचीपूड घालून ढवळावे आणि उकळी येण्याचे आंतच गॅस बंद करावा.
सरव्हिंग ग्लास / बाउल्स मधून गरम गरम गरम गरम खीर सर्व्ह करावी.
टीप : खारके ऐवजी खारीक पूड घातली तरी चालेल.
बदाम व  खारीक भिजवलेले पाणी तसेच बदामाची सालेसुद्धा खूपच  पौष्टिक असतात.म्हणूनच सोललेली बदामाची साले चावायला जरा वातट लागत असली तरीही सालांमध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट असल्यामुळे पाणी आणि साले फेकून न देता खाऊन टाकावीत.
या पौष्टिक खिरीत आपण आपल्या आवडीनुसार पिस्ता, काजू, बेदाणे, मनुका,सुके अंजीर,आक्रोड,जरदाळूचे काप सुद्धा घालू शकतो व खिरीची पौष्टिकता आणखीन वाढवू शकतो.

अळीव भिजायला घालंताना दुधात किंवा पाण्यात घातल्यावर थोड्या वेळाने ते चमच्याने निट ढवळावे. अळीव खूप हलके असते आणि त्यामुळे ते पाण्यावर/ दुधावर तरंगते आणि कधीकधी निट भिजत नाहीत.

No comments:

Post a Comment