कच्च्या कैरीचा चुंदा
(चटणी)
परवाचे
दिवशी आम्ही मंडईत गेलो तेंव्हा कैर्या बघून तोंडाला एकदम पाणीच सुटले. मग आम्ही कैर्या विकत घेतल्या. काल कैरीची चटणी केली व आज कच्च्या कैरीचा चुंदा
(आंबट-गोड चटणी) केली आहे त्याचीच रेसिपी पुढे देत आहे.
साहित्य : एक
मोठ्ठी कैरी (किसून) ,चवीनुसार
गूळ ,साखर,मीठ व लाल तिखट व फोडणीचे
साहित्य तेल,मोहरी.जिरे,हिंग,मेथया दाणे व हळद.
कृती : विळीवर कैरीची
जाड साले काढून टाकावीत व कैरी किसून घ्यावी, एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये कैरीचा कीस घेऊन त्यात चवीनुसार गूळ,साखर मीठ व तिखट घालून चमच्याने चांगले हलवून मिक्स करून तीन-चार तास मुरत
ठेवावे. गॅसवर एका काढल्यात तेल तापवून घेऊन मोहरी,जिरे,मेथया दाणे ,हिंग व हळद घालून फोडणी करावी व ती मुरलेल्या मिश्रणावर घालून पुन्हा एकदा चांगले
हलवून घ्यावे.
जेवणात तोंडी लावणे
म्हणून हा झटपट होणारा चुंदा कशाबरोबरही फारच चटकदार व चविष्ट लागतो. आठ-दहा दिवस
टिकतोसुद्धा !
No comments:
Post a Comment