शेंगदाण्याची आमटी
साहित्य : १२५ ग्राम शेंगदाणे , चवीनुसार हिरव्या मिरचयांचे तुकडे,मीठ,साखर व आसुल किंवा चिंच ,फोडणीसाठी
साजूक तूप किंवा रिफाईंड तेल व जिरे.
कृती : प्रथम शेंगदाणे भाजून व साले काढून घ्या,मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे,चवीनुसार
हिरव्या मिरचयांचे तुकडे,मीठ,साखर व
आमसुले किंवा चिंच एकत्र घेऊन पाणी घालून फिरवून घ्या ,गॅसवर एक स्टीलचा मोठा उभा गंज
किंवा पातेले साजूक तूप किंवा रिफाईंड तेल घालून तापत ठेवा,त्यात जिरे घालून फोडणी करून घ्या व मग त्या फोडणीत मिक्सरमध्ये फिरवून
घेतलेले मिश्रण घाला व चांगले उकळू द्या.
झाली ही उपासाची
शेंगदाण्याची आमटी तय्यार.
भगर किंवा साबुदाणा
खिचडी बरोबर ही सर्व्ह करा. सर्व करतेवेळी गरम आमतीवर वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर
घाला.
No comments:
Post a Comment