शिळ्या पोळीचे स्वादिष्ट खमंग लाडू
नमस्कार मित्रहो ! आज आहे रविवार , दिनांक ३० मार्च २०१४,
आमचे एक मित्र सुनील भुतकर कधी रविवारी आमच्याकडे आलेच तर माझ्या पत्नीला विचारात असत,'काय वाहिनी आज "साप्ताहिकीला" काय केले आहे ? "साप्ताहिकी म्हणजे आदल्या दिवशी रात्री केलेला एखादा पदार्थ उरला असेल तर आम्ही त्या शिळ्या पदार्थातून सकाळच्या नाश्त्यासाठी एखादा अफलातून नवा पदार्थ बनवत असू. त्यामुळे आजची "साप्ताहिकी' म्हणजेच कालच्या शिळ्या पोळ्यांचा वापर करून आम्ही त्याचे खमंग लाडू केले आहेत. म्हणूनच आजची माझी रेसिपी आहे एका नव्या पदार्थाची ज्याचे नांव आहे ' शिळ्या पोळीचे स्वादिष्ट खमंग लाडू '
कृती : शिळ्या पोळ्या हाताने किंवा मिक्सरमधून बारीक कुस्करून घ्या,एका कढल्यात किसलेले सुके खोबरे व खसखस भाजून घ्या,गॅसवर एका कढईत तूप घाला व ते तापल्यावर त्यात पोळीचा कुस्करा घालून त्यावर अर्धा कप दूध घाली,मग साखर व किसलेला गूळ घालून लाकडी कलथ्याने मिक्स करून घ्या,त्यावर भाजलेले सुके खोबरे , खसखस व विलायची-जायफळ यांची पूड घालून चांगले मिक्स करून घ्या.मिशन घट्ट झाल्यावर गॅस बंद करून गार होऊ द्या.
गार झाल्यावर तुपाच्या हाताने लाडू वळा.
चार शिळ्या घडीच्या पोळ्यांचे सुमारे १२ लाडू होतात.
No comments:
Post a Comment