तुम्हाला माहितीच असेल की मिसळ
ही पूर्णपणे कटावर अवलंबून असते. कट म्हणजेच मिसळीचा रस्सा ! यालाच " तर्री " असेही म्हणतात.
मिसळीच्या
कटासाठी (रश्यासाठी)लागणारा मसाला : प्रथम एका कढईत सुकया खोबर्याचा कीस आणि तीळ
वेगवेगळे कोरडेच (तेल न घालता) भाजून घेऊन ते वेगळ्या ताटात काढून ठेवावे. त्याच कढईत
अगदी थोडे तेल घालून त्यात एक वाटी उभा चिरलेला कांदा, आलं - लसूण पेस्ट घालून कांदा गुलाबी होई पर्यंत परतून घेऊन ते
भाजलेल्या तीळ व खोबर्याच्या ताटातच बाजूला काढून ठेवावे.त्यानंतर कढईत पुन्हा
थोडं तेल घालून त्यात अख्खे धणे, आणि सगळा अख्खा गरम मसाला परतावा आणि त्यातच लाल मिरच्या आणि
नंतर ओला नारळ घालून आणखी थोडा वेळ परतून घ्यावे.गरम मसाला आणि मिरच्यासाठी तेल
कमी लागते.. त्यामुळे त्यातच ओला नारळ परतावा म्हणजे खूप तेलकट नाही होणार. आता
भाजलेला हा सगळा मसाला आणि एका टोमॅटोचे मोठे तुकडे करून मिक्सर मधून एकदम बारिक
वाटून घ्यावे. हा झाला मसाला.
कट
किंवा रस्सा : ह्या कटासाठी जाड बुडाच्या पातेल्यामध्ये साधारण अर्धा डाव तेल
घालावे. तेल चांगले तापले म्हणजे त्यात प्रथम थोडा बारीक चिरलेला कांदा, कढीपत्याची पाने, हळ्द, हिंग व जिरे घालावे. कांदा
गुलाबी झाला की, त्यात २-४ चमचे कांदा लसूण मसाला घालावा व लगेचच त्यावर २ चमचे
साखर घालावी. कांदा लसूण मसाल्याचे प्रमाण चवीनुसार बदलावे. साखर मात्र विसरू नये.
तेलातच साखर घातल्याने कमी तेलात तर्री नवाचा प्रकार मिळतो. यात आता वाटलेला सगळा
मसाला घालावा आणि थोडा वेळ परतावा. आधीच शिजवून घेतल्याने केवळ टोमॅटो शिजेल इतपतच
तो परतावा. मग त्यात गरम पाणी घालावे. अंदाजे ४ कप पाणी घालावे. खूप दाट वाटल्यास
आणखी थोडे घालावे. पण खूप पातळ करू नये. आता यात मिठ घालावे आणि चवीनुसार कांदा
लसूण मसाला हवा असेल तर घालावा पुन्हा. उकळी आली की गॅस बंद करावा.(फोडणीत साखर
घातल्याने तर्री सुंदर येते. आणी निम्मेच तेल लागते. साखरेचा पाक होऊन तो लाल रंग
जबरद्स्त दिसतो..
No comments:
Post a Comment