गाजर रवा खीर
साहित्य : ५-६ नग
मध्यम आकाराची लालबूंद गाजरे , अर्धी वाटी बारीक रवा , तीन वाट्या साखर, चार चमचे साजूक तूप , दोन चमचे अमूल बटर , दोन चमचे मगज बी , तीन कप दूध , एक चमचा खसखस , एक छोटा चमचा विलायची पूड , एक छोटा चमचा जायफळ पूड , चार केशराच्या काड्या ,काजू व बदामाचे काप
कृती : प्रथम गाजरे
धुवून व किसून घ्या , रवा साजूक तुपावर सोनेरी रंगावर भाजून घ्या , गाजराचा कीस व
भाजलेला रवा आणि मगज बी मिक्सरमधून फिरवून (वाटून) घ्या , एका नॉन स्टिक
भांड्यात साजूक तूप व अमूल बटर गरम करून त्यात गाजर रव्याचे वाटण घालून परतून घ्या
व मग दूध घालून शिजवून घ्या, नंतर त्यात साखर,विलायची व जायफळ पूड आणि चमचाभर दुधात चार केशराच्या काड्या खालून
घेऊन ते सर्व घाला व पांच मिनिटे शिजवून घेऊन गॅस बंद करा, आता त्यात काजू
बदामाचे काप घालून जास्त घट्ट वाटल्यास
जरुरीप्रमाणे आणखी थोडे दूध घाला चव बघा , खीर अगोड वाटल्यास
हवी तेव्हढी साखर घाला व ढवळून मग काचेच्या बाउल्स मधून खीर सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment