चटकदार मटकीची उसळ
साहित्य
: दोन वाट्या मोड आलेली मटकी, ३-४ मध्यम आकाराचे कांदे, १०-१२लसूण पाकळ्या, बोटभर आल्याचा तुकडा, चवीनुसार तिखट (लाल), मीठ, २
टेबल स्पून गोडा किंवा कांदा-लसूण मसाला,
२ टेबल स्पून किसलेलं सुकं खोबरं, १ टेबल
स्पून खसखस, २ मोठे टोमॅटो, मूठभर कोथिंबीर,
फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद
व हिंग.
कृती : कांदे चिरून त्याच्या मोठ्या फोडी करून त्या थोड्या तेलावर लालसर परतून घ्या. गोटा खोबरे किसून व भाजून घ्या. मोड आलेली मटकी, थोडेसे मीठ व पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्या देऊन शिजवून घ्यावी. कांदा, खोबरं, लसूण, आलं, लाल तिखट, गोडा मसाला, खसखस, टोमॅटो, थोडी कोथिंबीर मिक्स करून हे जिन्नस मिक्सरमधून वाटून घ्यावं. नेहमीप्रमाणे तेलात हिंग ,हळद व मोहरीची फोडणी करून वाटलेला मसाला घालून तो परतावा. चांगले परतल्यावर प्रेशर कुकरमध्ये शिजवलेली मटकी पाण्यासकट त्यात घालावी. १५-२० मिनिटे मंद आचेवर मटकी शिजवून घेतल्यावर त्यात कोथिंबीर घालून झाकण ठेऊन गॅस बंद करावा.

No comments:
Post a Comment