Monday 23 November 2020

जास्वंदीच्या फुलांचा आरोग्यदायी चहा

 

जास्वंदीच्या फुलांचा आरोग्यदायी चहा 

 


जास्वंदीच्या फुलांचा वापर करून बनविलेला चहा आपल्या शरीरातील कोलेस्टेरोलची मात्रा नियंत्रित ठेवण्यास लाभकारक आहे. यामध्ये असलेली पोषक द्रव्ये हृदयनलिकांमध्ये प्लाकपासून तयार होणारा अवरोध रोखतात. त्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरोल कमी होण्यास मदत मिळते. तसेच जास्वंदीची पाने उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी गुणकारी आहेत. जास्वंदीची पाने पाण्यामध्ये घालून ते पाणी उकळून त्याचे सेवन केले असता, हृदयाची जलद गती संथ होण्यास सहाय्य मिळून शारीरिक थकवा दूर होतो.

रेसीपी : २ कप पाण्यात जास्वंदीची फुलं आणि त्याची सुकी पानं टाकावीत. पाणी उकळवावं. पाणी जेव्हा अर्ध राहतं, तेव्हा हे खाली उतरवून गाळून घ्यावं. त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस आणि काही थेंब मध मिक्स करावा. अशा प्रकारे जास्वंदीचा स्वादिष्ट चहा तयार होतो. हा चहा दिवसातून २ ते ३ वेळा प्यायल्यास, तुम्हाला स्वतःलाच तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवेल. फायदे : जास्वंदीच्या फुलांचा वापर करून बनविलेला चहा आपल्या शरीरातील कोलेस्टेरोलची मात्रा नियंत्रित ठेवण्यास लाभकारक आहे. यामध्ये असलेली पोषक द्रव्ये हृदयनलिकांमध्ये प्लाकपासून तयार होणारा अवरोध रोखतात. त्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरोल कमी होण्यास मदत मिळते. तसेच जास्वंदीची पाने उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी गुणकारी आहेत. जास्वंदीची पाने पाण्यामध्ये घालून ते पाणी उकळून त्याचे सेवन केले असता, ह्र्रुद्याची जलद गती संथ होण्यास सहाय्य मिळून शारीरिक थकवा दूर होतो.

टीप : जास्वंदीची फूले कोणत्याही रंगाची असली तरी चालतात . फुलाचा जो रंग असेल त्या रंगाचा चहा बनेल.

No comments:

Post a Comment