मोहरीच्या पानांची
भाजी
मोहरीची आणि पालकयांची पाने स्वच्छ धुवू्न बारीक चिरून
घ्यावीत व कढईमध्ये मऊ होईपर्यंत
चांगली घोटून घोटून शिजवावी नंतर दोन चमचे मक्याचे किंवा चणा डाळीचे
(बेसन) पीठ घालून घोटावी
दूसरीकडे कढईमध्ये मोहरीचा तेलात बारीक केलेली आलं लसून हिरवी मिरची व कांदा
चांगला परतावा , त्यामध्ये
शिजलेली भाजी टाकावी नंतर परत कढईत तूप घेऊन त्यामध्ये अख्या लाल , हिरव्या मिरच्या टाकून तडका द्यायचा गरम गरम वाढतांना त्यामध्ये बटर किंवा
लोणी टाकायचं खूप छान होते ही भाजी करून नक्की बघा. पोळी, भाकरी
किंवा मक्याच्या रोटी सोबत खा
टीप : मोहरीच्या पानांसोबत पालक पण टाकावा नाही तर उष्ण तापमान असलेल्या प्रातांत ही मोहरीच्या पानांची भाजी उष्ण पडते आणि पालक
टाकल्याने मोहरीचा उग्र पणा पण कमी होतो. कोवळा पालक २ जुडी आणि राई १जुडी असे
प्रमाण घ्यावे
पालक पनीर ची भाजी बनवतो तशीही बनवता येते.
अगदी साधी भाजी बनवता येते, मोहरीची पाने बारीक
चिरून घ्यावी, कढई गॅस वर ठेऊन जिरे लसूण हिरवी मिरची बारीक तुकडे
ची फोडणी करावी, पार कोरडी होईपरर्यंत शिजवावी, गरम गरम बाजरी किंवा
ज्वारी च्या भाकरी सोबत खमंग लागते.
No comments:
Post a Comment