मला आलेला एक विलक्षण प्रेरणादायी अविस्मरणीय अनुभव आज मी येथे तुमच्या बरोबर शेअर करू इच्छितो :
पुण्यातील चतुशृंगीच्या पायथ्याजवळ असलेल्या लक्ष्मी सोसायटीमधील बंगला नंबर २२ मध्ये राहणार्या नलिनी केसकर नावाच्या ८५ वर्षांच्या तरुण (यांना वृद्ध कसे म्हणायचे ?) आजी मला बहिर्यालाही ऐकू येईल अशा सुस्पष्ट व खणखणीत आवाजात माझ्याशी सुसंवाद साधत मला म्हणाल्या की,तुमच्या गच्चीवरील मातीविरहित बाग (संस्था) बद्दल ११ एप्रिल २०१८ च्या दैनिक लोकसत्ताच्या पुरवणीत (पुणे आवृत्ती) आलेला लेख मी वाचला व त्यातून स्फूर्ती व प्रेरणा मिळाल्याने त्यांची घरीच बागेसंबंधी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यांना घरातील ओला कचरा घरातच जिरवायचा आहे व त्यापासून कंपोस्ट खत कसे बनवावे याची माहिती त्यांनी माझ्याकडून घेतली आणि त्यादिवसापासून त्यांनी ओलाकचरा घरातच जिरवायला सुरवातही केली हे विशेष.
या वयातील त्यांची ही दुर्दम्य ईच्छाशक्ती व पर्यावरणासाठी आपण काहीतरी योगदान द्यावे या तळमळीला माझा सलाम !
प्रमोद तांबे , १४१५ सदाशिव पेठ, पुणे,दूरध्वनी : (०२०) २४४७ ४७८३ कर्णपिशाच्च (मो) ८४४६३ ५३८०५
No comments:
Post a Comment