#डाळीच्या पिठाचे #धिरडे
साहित्य : एक वाटी बेसन/चणा डाळीचे पीठ,एक कांदा बारीक चिरून,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्या किंवा ठेचाव मीठ,एक
छोटा चमचा हळद
कृती : एका भांड्यात बेसन पीठ,बारीक चिरलेला कांदा व हिरवी मिरची/ठेचा घ्या, त्यात थोडे पाणी, मीठ आणि हळद टाका व चांगले मिक्स करून
घ्या. गॅसवर एका फ्रायपॅन मध्ये थोडे (जास्त) तेल गरम करा आणि त्यात हे मिश्रण
टाका. थोड्या वेळाने धिरडे उलटे करा व शिजवून घ्या. तेल थोडे जास्त असेल तर कडेचा
भाग आगदी भज्यासारखा तळला जातो आणि कुरकुरीत लागतो. हे बेसन धिरडे तसेच खाल्ले तरी मस्त लागते . मात्र हे धिरडे
पोळी/स्लाइस ब्रेड बरोबर खायला जास्त चांगले.
No comments:
Post a Comment