भेंडीचे पंचामृत
साहित्य
: वाटीभर भेंडीचे गोल पातळ चिरलेले काप,लिंबाएव्हढा चिंचेचा गोळा,चवीनुसार
मीठ व गूळ,अर्धा चमचा लाल मिरचीचे तिखट,एक टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट,एक टेबलस्पून
भालेल्या तीलाचे कूट,फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,अर्धा चमचा जिरे,अर्धा चमचा मोहरी,अर्धा चमचा बारीक चिरलेला लसूण,५-६ कढीपत्त्याची
पाने.
कृती
: प्रथम
गरम पाण्यात चिंच १५ मिनिटे भिजत घालून ठेवा. १५ मिनिटांनी भिजलेल्या चिंचेचा कोळ
काढून ठेवा.
आता
गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घ्या. तेल चांगले गरम झाले की त्यात जिरे
व मोहरी टाका व दोन्ही चांगली तडतडल्यावर
त्यात बारीक चिरलेला लसूण व कढीपत्त्याची पाने टाकून परता व नंतर त्यात भेंडीचे गोल पातळ चिरलेले काप टाकून परतून घ्या.
वाफेवर भेंडी थोडी शिजली की,चिंचेचा कोळ, गुळ,तिखट, मीठ टाकून उकळी आली की मग दाण्याचे कुट व तीळाचे
कुट टाकुन छान शिजू द्या.(कच्या चिंचेचा उग्र वास जाईपर्यंत शिजवा)सगळे घटक चांगले
शिजले की गॅस बंद करा. आपले भेंडीचे पंचामृत तय्यार. जेवणात डावीकडचे तोंडीलावणे
म्हणून सर्व्ह करा. छान लागते.
No comments:
Post a Comment