साहित्य- दोन वाट्या पातळ पोहे, दोन वाट्या बारीकचिरलेली कोथिंबीर , पाऊण वाटी साबूदाणा, दोन चमचे पापडखार, एक टेबलस्पून पांढरे तीळ, एक टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ.
कृती - आदल्या दिवशी रात्री साबुदाणे भिजवून ठेवावे. दुसरे दिवशी सकाळी त्यात,पाण्यात घालून लगेच काढलेले पातळ पोहे मिसळून घ्यावे व मग त्यात पापडखार, पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक टेबलस्पून तेल व चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य घालून हाताने चांगले कालवून आणि मळून घ्या. या मिश्रणाचे छोटे गोळे करा. नंतर पोळपाटावर तेल लावलेला प्लास्टिक कागद
ठेवून त्यावर छोटा गोळा ठेवून त्याला जरा दाबून वरूनही प्लास्टिक कागद ठेवून
पुरीच्या आकाराप्रमाणे चांगले पातळ लाटून घेणे. अशा प्रकारे आपण नेहणी जसे पापड लाटतो तश्याच या पापडय़ा लाटूनघ्याव्यात. या
पापडय़ा प्रथम घरातच ५-६ तास सुकवाव्यात नंतर त्या पापडय़ा ३-४ दिवस कडकडीत उन्हात
वाळवाव्यात. या पापडय़ा वर्षभर छान टिकतात.
No comments:
Post a Comment