"मेथी - केळी वडे"
साहित्य : बारीक चिरलेली मेथी,एक पिकलेले केळं,बेसन/चणा डाळीचे पीठ,चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा,लाल मिरचीचे तिखट,मीठ,ओवा,धने पूड,चिमूटभर साखर,चिमूटभर खायचा सोडा.
कृती : प्रथम मेथी बारीक चिरून व केळं कुस्करून घ्या. मग दोन्ही एकत्र
करून त्यात वरील सर्व साहित्य तुमच्या अंदाजाने घालावे. थोडे कच्च्या तेलाचे मोहन
घालून घट्टसर मळून घ्या. अर्धा एक तास तसेच मुरत ठेवावे. ह्या पिठाचे हातावर चपटे
वडे थापून घेऊन गोल्डन रंगावर तळावेत.
चटणी सॉस किंवा गरम गरम चहा सोबत खायला द्या
No comments:
Post a Comment