साहित्य : एक
वाटी रवा , एक वाटी मैदा , चवीपुरते एक चिमूटभर
मीठ , पाकासाठी एक वाटी साखर , मोहन व तळण्यासाठी तेल ,विलायची पूड ,जिलबीचा खाद्य रंग ,व्हॅनिला ईसेन्स
कृती : रवा, मैदा व चिमूटभर मीठ एका भांड्यात एकत्र करून घ्यावं. कडकडीत तेल तापवून ते मोहन या मिश्रणात टाकून मिश्रण ओलसर करून घेऊ साध्या पाण्यात भिजवून ३ - ४ तास झाकून मुरण्यासाठी ठेऊन द्यावे.
आता एका वाटीत मैदा व तूप एकत्र करून पाणी घालून पातळ भिजवावे.
भिजवून ठेवलेले रवा- मैद्याचे पीठ चांगले मुरले की मिश्रण हाताला ओलसर लागतं. मुरल्यानंतर मिश्रणाचे पोळीसाथी कणकेचे करतो तसे गोळे करून घ्यावे व पोळी लाटावी. या पोळीच्या एका बाजूवर मैदा व तूपाचं मिश्रण पसरुण घेऊन ती पोळी बाजूला ठेवावी. दुसरी पोळी लाटून तिच्यावरही मैदा व तुपाचं मिश्रण एका बाजूला लावावं. दोन पोळ्या एकावर एक ठेवून त्याचा रोल करावा. या रोलचे छोटे तुकडे करावे. हे तुकडे पुन्हा एकदा लाटून घेऊन यांची पूरी करावी. या पुर्या मध्यम आचेवर तेलात गुलाबी रंग येईपर्यंत तळाव्यात. एकावर एक अशा पोळ्या ठेवल्यानं व त्यांच्या रोल्सचे तुकडे करून त्यांच्या पुर्या केल्याने या पुर्यांना छान पदर सुटतात. पुर्या थंड होण्यासाठी एका परातीत अथवा ताटात काढाव्यात.
एका जाड बुडाच्या पातेल्यात अथवा निर्लेपच्या पातेल्यात एक वाटी साखर घेऊन तिच्यात थोडं पाणी टाकून ३ तारी पाक करून घ्यावा. त्यात थोडी विलायचीची पुड ,३-४ थेंब जिलबीचा खाद्य रंग व ३-४ थेंब व्हॅनिला ईसेन्स टाकावा. पुर्या थंड झाल्यावर या पाकात अर्धा तास बुडवून बाहेर काढाव्या व डब्यात भरून ठेवाव्यात.
ह्या पुर्या १० १५ दिवस छान टिकतात.

No comments:
Post a Comment