Search This Blog

Monday, 16 July 2018

#इन्स्टंट डोसा - #रेडी मिक्स

काल संध्याकाळी आम्ही घरीच डोशाची रेडी मिक्स पावडर (पीठ) करून ठेवले आणि आज सकाळी नाश्त्यासाठी डोसे,वाडगाव-शेरीच्या रत्नाकर जाधव सरांनी प्रेमाने भेट दिलेल्या शेवग्याच्या शेंगांचे आणि घरच्या बागेतील कढीपत्ता यांचा वापर करून ओल्या नारळाची चटणी केली होती.
येथे मी घरी बनवलेल्या डोसा रेडी मिक्स ची रेसिपी देत आहे. 

#इन्स्टंट डोसा - #रेडी मिक्स 

साहित्य : दोन वाट्या उडदाची डाळ ,एक वाटी चणा (हरबरा) डाळ,एक वाटी तुरीची डाळ,एक टेबलस्पून मेथीचे दाणे,सहा वाट्या तांदूळाचे पीठ,एक वाटी बारीक रवा, दोन चमचे पिठीसाखर, चवीनुसार मीठ,एक चमचा इनोज फ्रूट सॉल्ट.
कृती : उडदाची डाळ, चण्याची (हरबरा) डाळ, तुरीची डाळ, मेथी दाणे हे सर्व जिन्नस एकत्र एका मोठ्या पॅनमध्ये गॅसवर तापवून गरम करून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरच्या ग्राईंडर मध्ये बारीक पावडर करून घ्या. एका पॅन मध्ये तांदूळ पीठ व बारीक रवा एकत्र थोडा गरम करून घ्यावा. आता वरील सर्व साहित्य एकत्र करून कालवून घ्या आणि एका घट्ट झाकणाच्या हवाबंद बरणीत किंवा डब्यात भरून ठेवा.
इन्स्टंट डोसा रेडी मिक्स पीठ वापरुन डोसे बनवण्याची कृती : एका बाउलमध्ये दोन वाट्या इन्स्टंट डोसा रेडी मिक्स पीठ घ्या व त्यात पाणी घालून नेहमी डोश्यांसाठी ब्जिजवतो त्या कन्सिस्टंसीचे पीठ करून ते मिक्सरच्या लिक्विड जर मध्ये घालून दोन मिनिटे फिरवून घ्या आणि दहा मिनिटानंतर गॅसवर डोश्यांचा तवा तापवून घेऊन त्यावर डोसे घाला. सुरू केल्यापासून १५-२० मिनिटात डोसे तय्यार !

No comments:

Post a Comment