साहित्य : अर्धी वाटी कुरडयांचा चुरा, एक
वाटी दही,एक बारीक चिरलेला कांदा,अर्धा चमचा साखर,चवीनुसार मीठ,तडका फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,एक
छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा जिरे,चिमुटभर
हिंग,एक बारीक चिरलेली हिरवी मिरची,५-६
कढीपत्त्याची पाने,
कृती : एका बाउलमध्ये कुरडयांचा चुरा गरम पाण्यात घालून दोन तास भिजत
ठेवा.नंतर चाळणीतून गाळून जास्तीचे पाणी काढून टाकून एका बाउलमध्ये घेऊन त्यात दही,बारीक
चिरलेला कांदा,चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी
मिरची,मीठ व साखर घालून मिक्स करा. गॅसवर एका कढल्यात मोहरी,जिरे,हिंग व कढीपत्त्याची पाने घालून तडका फोडणी करून ती
या कोशिंबीरीवर ओता आणि कालवून घ्या. वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवून ही कुरडयांची
कोशिंबीर सर्व्ह करा.

टीप: कुरडयांत मुळचे मीठ असते म्हणून कोशिंबीरीची चव बघून मगच मीठ
घाला,नाहीतर कोशिंबीर जास्त खारट होईल. गरम पाण्यात कुरडया भिजत घाल्यावर
दोन तासांनी त्या फुगून त्यांचा आकार तिप्पट मोठा होतो हे लक्षात घेऊनच चुरा
घ्यावा.
No comments:
Post a Comment