"वांग्याचे परतून केलेले भरीत"
साहित्य : एक मोठ्ठे भारताचे वांगे ,दोन मध्यम आकाराचे कांदे,एक मोठा
लाल टोमॅटो,पाव वाटी शेंगदाणे ,
चवीनुसार हिरव्या मिरच्यांचा ठेचा ,मीठ व साखर,आले-लसूण पेस्ट,धने व जिरे पूड , फोडणीसाठी दोन डाव तेल,मोहोरी, जिरे, हळद,हिंग,१०-१२ कढीपत्त्याची पाने व अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर व सजावटीसाठी
बारीक चिरलेली कांद्याची पात.
कृती : तेलात बुडवून काढलेल्या सुरीने वांग्याला सर्व
बाजूंनी छेद घ्यावेत व गॅसवर सर्व बाजूंनी ते वांगे चांगले भाजून घ्यावे , व कच्चे राहणार नाही ह्याचे काळजी घ्यावी. भाजलेल्या
वांग्याच्या काळ्या साली व देठ काढून
टाकून वांग्याचा गर (बलक) एका बाऊलमध्ये काढून घ्यावा व चांगला मॅश करून घ्यावा,गुठळ्या रहाणार नाहीत असे पहावे. कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. एका
कढईत तेल गरम करत ठेवावे व तेल चांगले गरम झाल्यावर त्यात कढीपत्त्याची पाने चुरुन
घालावीत,जिरे व मोहोरी घालून दोन्ही तडतडली की त्यात बारीक
चिरलेला कांदा,आले लसणाची पेस्ट व हिरव्या मिरच्यांचा ठेचा
घालून एकदा परतून घ्या, मग त्यात शेंगदाणे घालून परता,शेवटी बारीक चिरलेले टोमॅटो घालून परता व नंतर धने-जिरे पूड,हळद,हिंग घालून परतावे व हलवून चांगले एकजीव करून
घ्यावे व ह्या मिश्रणात मॅश केलेला वांग्याचा गर (बालक) व चवीनुसार साखर व मीठ
घालून आठ-दहा मिनिटे परतून घ्या व वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेऊन गॅस
बंद करा.
सर्व्ह
करतेवेळी पुन्हा वर कोथिंबीर व बारीक चिरलेली
काड्याची पात घाला व पुर्या किंवा कळण्याच्या भाकरीसोबत खायला द्या.
No comments:
Post a Comment