" अननसाचा शिरा
(पाईनॅपल) "
साहित्य : दोन वाट्या अननसाचे काप किंवा फोडी , दोन वाट्या जाड रवा , एक वाटी साखर (अननस जास्त आंबट
असेल तर साखरही जास्त घ्यावी) , अर्धी वाटी साजूक तूप , १०- १२ काजू पाकळ्या, १०- १२ बेदाणे , ६ वाट्या गाईचे दूध , ५-६ केशराच्या काड्या , एक छोटा छानचा वेलची पूड.
कृती : एका वाटीत थोडे (४ चमचे) गरम दूध घेऊन त्यात केशराच्या काड्या भिजत घालून बाजूला ठेवा, एका स्टीलच्या पातेल्यात २ वाट्या पाणी घेऊन त्यात अननसाचे काप किंवा फोडी घालून गॅसवर मध्यम आचेवर पूर्णपणे शिजवून घ्या. एकीकडे अननस शिजत असतांना एका कढईत साजूक तूप गरम करून त्यात काजुच्या पाकळ्या व बेदाणे टाळून घेऊन बाजूला टिश्यू पेपरवर काढून ठेवावेत. त्याच तुपात जाड रवा घालून सारखा परतत राहून सोनेरी गुलाबी रंगावर भाजून घ्यावा. अननस शिजला की फक्त अननसाच्या फोडी किंवा काप रव्यात घालुन पुन्हा परतून घ्या. अननस शिजवून उरलेल्या पाण्यात गाईचे दूध व साखर घालुन उकळवून घ्या,मग त्यात रवा आणि अननसाचे मिश्रण घालुन सारखे ढवळत राहून शिजवून घ्या. शिरा सुकायला लागला की त्यात साखर, केशर दुध, बेदाणे , काजू पाकळ्या आणि वेलची पूड घालणे व पूर्णपणे शिजवून घ्या.
No comments:
Post a Comment