" वांग्याचे
दहयातील भरीत "
साहित्य : भाजलेल्या एका मध्यम वांग्याचा गर (बलक) , एक मोठा बारीक चिरलेला कांदा , फोडणीसाठी तेल,मोहोरी,हळद,हिंग,जिरे, चवीनुसार हिरव्या मिरचयांचे तुकडे किंवा लाल तिखट , साखर , मीठ, जरुरीप्रमाणे दही , तीन मोठे चमचे शेंगदाण्याचे भरड असे कूट.
कृती : तेलात बुडवून काढलेल्या सुरीने वांग्याला सर्व बाजूंनी छेद घ्यावेत व गॅसवर सर्व बाजूंनी ते वांगे चांगले भाजून घ्यावे , व कच्चे राहणार नाही ह्याचे काळजी घ्यावी. भाजलेल्या वांग्याच्या काळ्या साली व देठ काढून टाकून वांग्याचा गर (बलक) एका बाऊलमध्ये काढून घ्यावा व चांगला मॅश करून घ्यावा,गुठळ्या रहाणार नाहीत असे पहावे. गॅसवर एका कढल्यात तेल गरम करावे. त्यात जिरे व मोहोरी घालून दोन्ही तडतडेपर्यन्त थांबावे. मग फोडणीत हळद व हिंग आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. तयार फोडणी वांग्याच्या गरावर घालावी.नंतर त्यात कांदा,मीठ,साखर,दही,शेंगदाण्याचे भरड कूट आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. जेवणात तोंडीलावणे म्हणून दह्यातील वांग्याचे भरीत फारच छान लागते. विशेषतः मुगाच्या डाळीच्या गरागरम खिचडीबरोबर तर ते जास्तच लज्जतदार व चविष्ट लागते.
No comments:
Post a Comment