" दही बुत्ती भात "
साहित्य : एक वाटी दिल्ली राईस किंवा बासमती तांदळाचा
नेहमीप्रमाणे शिजवलेला साधा भात , दोन वाटया गोड घट्ट दही , एक वाटी दुध , चवीनुसार
मीठ व साखर , एक मोठा चमचा साजूक तूप , एक चमचा जिरे ,पाच –सहा सांडगी
तळणीच्या मिरच्या ,दोन तीन काश्मिरी सुक्या लाल मिरच्या
, आठ – दहा कढीपत्त्याची
पाने , थोडी बारीक
चिरलेली कोथिंबीर .
कृती :
शिजलेल्या मोकळा भातात गोड घट्ट दही , दुध , चवीनुसार साखर व मीठ घालून भात मऊसर
कालवावा .
गॅसवर एका कढईत एका
मोठ्ठ्या चमचाभर साजूक तुपात जिरे , कढीपत्ता
आणि सांगडी मिरच्या व दोन तीन काश्मिरी सुक्या लाल मिरच्या घालून परतून घ्याव्या , व मिरच्या जरा कुस्कराव्या आणि
ती फोडणी भातात मिसळावी .
सर्व्ह करतेवेळी बारीक
चिरलेली कोथिंबीर घालून भात वाढवा .
टीप : हा भात प्रवासात
न्यायला सोयीचा पडतो . मात्र असा प्रवासात घ्यायच्या भातात दुध जास्त घालून दह्याचे
प्रमाण थोडे कमी करावे जेणेकरून भात फार आंबट
किंवा कोरडा होणार नाही .
No comments:
Post a Comment