" “ देठी “ – अर्थातच आळूच्या देठांचे भरीत "
साहित्य : १०-१२ आळूच्या पानाच्या मागचे लांब व जाड देठ,एक मोठ्ठा कांदा, एक वाटी गोडसर
दही, अर्धी वाटी शेंगदाण्याचे भरड कूट,फोडणीसाठी
दोन टे.स्पून तेल , मोहोरी , जिरे , हळद व हिंग , चवीनुसार लाल तिखट , मीठ , साखर
व लिंबाचा रस , अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती : प्रथम आळूच्या पानाच्या देठांवरचे साल (स्कीन)
काढून देठांचे बारीक तुकडे चिरून घेऊन ते
शिजवून घ्या व स्मॅश करून घ्या , कांदा साले काढून बारीक चिरून घ्या.एका बाउलमध्ये स्मॅश केले आळूचे देठ , दही , शेंगदाण्याचे भरड कूट व चवीनुसार साखर,मीठ व लिंबाचा रस घालून चांगले हालवून एकजीव करून घ्या ,गॅसवर एका कढल्यात फोडणीसाठी तेल तापत ठेऊन तेल तापल्यावर मोहोरी व जिरे
घाला व ते चांगले तडतडल्यावर त्यात हळद व
हिंग घालून भरतावर आधी चवीनुसार लाल तिखट घाला व मग त्यावर ती गरम फोडणी घाला (लाल
तिखट फोडणीतच घातले तर ते जळते म्हणून ते प्रथम भरतावर घालून त्यावर गरम फोडणी घालावी) व पुन्हा एकवेळ
चांगले हलवून सगळीकडे फोडणी व तिखट लागेल असे बघा. सर्व्ह करण्यापूर्वी भरतावर
बारीक चिरलेली कोथिंबीर घालून द्या.
तोंडीलावणे म्हणून
ही आळूच्या पानाच्या देठांची केलेली “देठी” (भरीत) पोळीबरोबर खाण्यास फारच चविष्ट
लागते.
No comments:
Post a Comment