" तव्यावरचे कोरडे पिठले "
आयत्यावेळी कामीतकमी
वेळात तयार होणारे तोंडीलावणे म्हणजे हे तव्यावरचे कोरडे पिठले होय.
साहित्य : दीड वाटी बेसन (चणा डाळीचे) पीठ ,चवीप्रमाणे लाल तिखट व मीठ ,
८-१० लसूण पाकळ्या बारीक चिरून, फोडणीसाठी
दोन टे.स्पून तेल मोहोरी,जिरे,हळद ,हिंग , ८-१० कढीपत्त्याची पाने,बचकभर बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादासाठी थोडी कसूरी मेथी
कृती : एका बाउलमध्ये बेसनाचे पीठ घेऊन त्यात
चवीप्रमाणे लाल तिखट व मीठ , ८-१० बारीक चिरलेली व ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या व जरूरी प्रमाणे पाणी
घालून भज्याप्रमाणे सरबरीत असे पीठ भिजवा. गॅसवर तवा तेल घालून तापत ठेवा,तेल चांगले तापल्यावर प्रथम त्यात मोहोरी व जिरे घाला,दोन्ही चांगले तडतडल्यावरच मग त्यात हळद , हिंग ,कढीपत्त्याची चुरडलेली पाने व कसूरी मेथी घालून परता,आता त्यावर बाउलमध्ये भिजवलेले बेसनाचे पीठ घालून परतत रहा,चांगला खरपूस लाल रंग येईपर्यंत
परतत रहा,मग सर्व बाजूंनी चमच्याने तेल सोडून पुन्हा परता.
चित्रात दाखवल्याप्रमाणे कोरडे पिठले झाल्यावर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर
घालून झ थोडावेळ झाकून ठेवा व मग पोळीबरोबर
सर्व्ह करा.
कधी बरोबर हे कोरडे
तव्यावरचे पिठले हा उत्तम असा मेन्यू आहे.
No comments:
Post a Comment