" मिक्स व्हेजिटेबल कटलेटस्"
साहित्य : दोन मध्यम बटाटे,एक मध्यम बीट,पाव वाटी मक्याचे दाणे, अर्धा मध्यम कोबीचा गड्डा , दोन छोटी गाजरे, ८-१० फरसबीच्याशेंगा , पाव वाटी मटार, एक भोपळी मिरची, चवीपुरते लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्यांचा ठेचा चवीपुरते मीठ,एक चमचा लिंबाचा रस.तळणीसाठी तेल.
कृती
: सर्वात प्रथम बटाटे व बीट उकडून व किसून
घ्या ,मटार
व मक्याचे दाणे वाफवून घेऊन नंतर मिक्सर मधून भरड फिरवून घ्या, कोबी, गाजर, फरसबी, भोपळी मिरची अशा भाज्या किसून अगर
बारीक चिरून घ्या, त्यामध्ये थोडी आले-लसूण पेस्ट, चवीपुरता
हिरव्या मिरच्यांचा ठेचा किंवा लाल तिखट व मीठ घाला,थोडासा
लिंबाचा रसही घातला तरी चालेल.हे सगळे जिन्नस एकत्र करून चांगले
कालवून घ्या व त्यांचे पॅटिसच्या आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करा. आणि ते वाळवलेला
पाव मिक्सरमध्ये फिरवून घेऊन रव्यासारख्या पावडरमध्ये घोळवून घेऊन मंद आचेवर थोडय़ाशा तेलात परतवा अगर
फ्राय पॅनमध्ये तेलात तळून घेऊन टिश्यू पेपरवर काढावेत.
सर्व्ह
करतेवेळी ह्या गरम कटलेटस् बरोबर हिरवी चटणी, चिंचेची चटणी किंवा टोमॅटो केचप द्या.
No comments:
Post a Comment