आरोग्यदायी
गुळाचा चहा (मधुमेहींना वरदान)
साहित्य
– २ कप पाणी, ४ कप दूध, पेरभर ठेचलेले / किसलेले आलं, एक
छोटा चमचा वेलची पावडर, ६/७ गवती चहाच्या काड्या, चमचे
चहापत्ती आणि ४ चमचे किसलेला गुळ.
कृती
- प्रथम पाण्यात चहापत्ती, आलं, गवती चहा, वेलची पावडर ३ मिनिटे मोठ्या आचेवर उकळून घ्या.
त्यानंतर यात दूध घालून किमान ५ मिनिटे चांगले उकळून घ्या. त्यानंतर पूर्ण गॅस मंद
करून यात किसलेला गुळ घालावा आणि गुळ
विरघळे पर्यंत चहा उकळून घ्यावा. ( गुळ घातल्यावर चहा सारखा ढवळू नये आणि दूध
मोठ्या आचेवर असताना यात गुळ घालू नये. अन्यथा दुध फाटू शकते ) तयार चहा कपमध्ये गरमागरम
ओतून घ्यावा.
No comments:
Post a Comment