तांदुळ डाळीचे वडे
सर्वप्रथम एक वाटी तांदुळ (शक्यतो पुलावाचे), अर्धी वाटी उडदाची डाळ, मुठभर हरभरा डाळ. हे तिनही घटक एकत्र करुन
दोन पाण्यात स्वच्छ धुवुन घ्या. तीसर्यावेळी यात पुन्हा दोन इंच पाणी जास्त
घालुन झाकुन ठेवा. किमान दोन तास हे मिश्रण चांगले भिजु द्यावे. दोन तासानंतर
तांदुऴ व डाळी छान फुगलेल्या दिसतील. यातील कोणतेही पाणी न काढता सर्व मिश्रण
मिक्सरच्या मोठ्या भांड्यात ओतुन घ्या. यात अर्धा इंच आले तुकडा, दोन लाल मिरच्या, तीन ते चार हिरव्या मिरच्या व चवीनुसार
मीठ घालुन मिक्सरवर पाच मिनिटे फिरवुन घ्या. भांडे खाली काढुन पहा खुप सुंदर
घट्टसर बॅटर तयार होईल. एका पातेल्यात हे बॅटर ओतुन घ्या. तोपर्यंत कढईत प्रमाणात
तेल घालुन मंद आचेवर तापायला ठेवा. ओतलेले बॅटर झाकुन दहा मिनिटे ठेवा. तोपर्यंत
तेलही चांगले कडक होते. तापलेल्या तेलात चमच्याने एक-एक करुन वडे लालसर तळुन घ्या.
कोथिंबिर, मिरची, पुदिना, आले यांची पातळ चटणी बरोबर
सर्व्ह करा आणि मनसोक्तपणे एका अनोख्या पदार्थाचा अनुभव घ्या
No comments:
Post a Comment