Saturday 7 January 2023

कषाय (औषधी वनस्पतींचा आरोग्यदायी काढा)


कषाय (औषधी वनस्पतींचा आरोग्यदायी काढा)

साहित्य : एक टेबलस्पून धने,अर्धा टेबलस्पून जिरे,तीन वेलदोडे,तीन लवंगा,एक टेबलस्पून गुळाची पावडर ,एक चमचा काळीमिरी पावडर,एक चमचा आल्याचा कीस,तीन टेबलस्पून दूध (चवीनुसार कमी-जास्त करावे)
कषाय पावडर बनवण्याची कृती : धने,जिरे,लवंगा व वेलदोडे एकत्र घेऊन मिक्सरमधून फिरवून पावडर बनवून घ्या. (जर ही पावडर जास्त दिवस ठेवायची असेल तर आगोदार हे जिन्नस भाजून घ्या)
कषाय (काढा) पेयाची कृती : एका पॅन मध्ये एक कपभर पाणी त्यात एक चमचाभर कषाय पावडर ,हळद ,आल्याचा कीस,चवीनुसार गूळ व साखर घालून उकळून घ्या. आता त्यात २-४ चमचे दूध घालून गरम असतांनाच प्यायला द्या.
टीप : थंडीत प्यावा. आरोग्य उत्तम रहाते.

No comments:

Post a Comment