Monday 23 January 2023

कुळीथ पिठाच्या पौष्टिक व स्वादिष्ट वड्या

कुळीथ पिठाच्या पौष्टिक व स्वादिष्ट वड्या







साहित्य : अर्धी वाटी कुळीथाचे पीठ,दोन टेबलस्पून कणिक,एक टेबलस्पून बेसन पीठ,अर्धी वाटी साजूक तूप,एक पूर्ण पिकलेले केळे,एक वाटी किसलेला गुळ ,एक वाटी ओल्या नारळाचा चव,एक छोटा चमचा वेलची पूड,एक चमचा खसखस,१०-१२ बेदाणे व १०-१२ काजू पाकळी
कृती : एका नॉनस्टिक पॅन मध्ये साजूक तुपावर अर्धी वाटी कुळीथाचे पीठ ,दोन चमचे कणिक आणि एक चमचा बेसन पीठ खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्या.
त्याच पॅनमध्ये थोड्याशा साजूक तुपात १०-१२ बेदाणे व १०-१२ काजू पाकळी परतून घ्या.
आता त्याच पॅनमध्ये ओल्या नारळाचा चव,किसलेला गूळ आणि कुस्करलेले पिकलेले केळे घालून खमंग परतून / शिजवून घ्या. शिजत असतांनाच त्यात खसखस व वेलची पूड घाला. एक छोटा चमचा मीठ घाला. या मिश्रणातच तुपावर परतलेले १०-१२ बेदाणे व १०-१२ काजू पाकळी घालून मिक्स करून घ्या.
गॅस बंद करून त्यात खमंग भाजलेली कुळीथ पीठ,कणिक आणि बेसन पीठ घालून कलथ्याने मिक्स करून घ्या.
एका स्टीलच्या थाळ्याला आतील बाजूने सगळीकडे साजूक तुपाचा हात चोळून घेऊन त्यात हे मिश्रण ओता व सगळीकडे सारख्या जाडीत पसरा.
सुरीला दोन्हीकडे तुपाचा हात लावून आपल्याला हव्या त्या आकारात वड्या कापून ठेवा.
थाळ्यातील वड्या थंड व घट्ट झाल्यावर सूरीच्या सहाय्याने वड्या थाळ्यातून काढून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
थंडीत रोज सकाळी या स्वादिष्ट व पौष्टिक वड्या खाव्यात.

No comments:

Post a Comment