Thursday 5 January 2023

कुळथाचे (हुलगे) माडगं

कुळथाचे (हुलगे) माडगं



साहित्य : दोन वाट्या मोड आलेल्या कुळथाचे/हुलग्याचं पीठ (मोड आलेले कुळीथ / हुलग्याचे दाणे तुपावर भाजून मिक्सरवर बारीक दळून पीठ बनवावं),पाव वाटी तांदूळाची पिठी,एक ग्लास दूध,अर्धा किलो गूळ,दोन टेबलस्पून साजूक तूप,७-८काजुच्या पाकळ्या,७-८ बदामांचे काप,७-८ बेदाणे,अर्धी मूठ चारोळया,एक छोटा चमचा मीठ.
कृती : प्रथम गॅसवर एका पॅनमध्ये कुळथाचे पीठ व तांदूळाची पिठी साजूक तुपावर लालसर होई पर्यंत भाजून घ्या. एक ग्लासभर पाणी घेऊन त्यात गूळ विरघळून घ्यावा,नंतर त्यात कुळथाचे पीठ व तांदूळाची पिठी घालून खिरीसारखे शिजवून घ्यावं .मग त्यात एक ग्लास दूध,काजूचे तुकडे,बदामांचे काप,बेदाणे आणि चारोळया घालून आणखी शिजवा. यात वेलदोड्यांची पूड घालायची गरज पडत नाही. कारण भाजलेल्या कुळथांना (हुलग्यांना) त्यांचाच एक प्रकारचा सुगंध असतो.
सगळ्यात शेवटी साजूक तूप घालून गॅस बंद करा. गॅसवरून खाली काढून सर्व्हिंग बाउल्स भरा आणि गरम गरम नाश्त्यासाठी सर्व्ह करा.
कुळथाचं माडगं थंडीत खूप पौष्टिक मानलं जातं.
कुळीथ खूपच पौष्टिक असतात,गुळातून लोह मिळते म्हणून पौष्टिक असते

लहान मुले, वयोवृद्ध , गरोदर स्त्रीया व बाळंतीणींसाठी उत्तम सात्विक आहार !!!  

No comments:

Post a Comment