भाजलेल्या भेंडीची कोशिंबीर किंवा भरीत
गँसवर
जाळी ठेवून त्यावर भेंड्या ठेवाव्यात. भाजतांना एक काळजी
घ्यावी की भेंड्या खूप काळ्या नको व्हायला. भरीत करताना वांग शिजले हे जसे समजतच
आपल्याला तशीच भेंडी पण समजते शिजल्यावर. भेंड्या थंड झाल्यावर वरच काळं साल काढून कुस्करून
घ्यावी. त्यात घट्ट दही, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ,साखर घालून
कालवून घ्यावे.वरून जिरे-मोहरीची फोडणी
किंवा कच्च तेल घालून एकत्रित कालवून आस्वाद घ्यावा.
No comments:
Post a Comment