Tuesday 3 January 2023

आरोग्यदायी पौष्टिक राइस सूप

 

आरोग्यदायी पौष्टिक राइस सूप




साहित्य :

१.      दोन टेबल स्पून तांदुळ (हातसडीचे मिळत असल्यास अतिउत्तम ),

२.      दोन  टेबल स्पून साजूक तूप, चवीपुरते मीठ, साखर ,हिंग, जिरे, कढीपत्ता ,हिरवी मिरची, पाणी.

कृती :

१.      प्रथम दोन टेबलस्पू तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्य.

२.      गॅसवर एका जाड बुडाच्या पातेल्यात एक चमचा साजूक तूप गरम करून घ्या मग त्यात धुतलेले तांदुळ घालून मंद आंचेवर थोडडेसे परतून घ्या .

३.      तांदुळ सोनेरी रंगाचे झाले की त्यात २ ग्लास पाणी घालून मोठ्या आंचेवर गॅस वर चांगली उकळी येउ द्या. अधून मधून चमच्याने ढवळत रहा.

४.      सूप जरा दाट झाले की त्यात चवीपुरती साखर , मीठ व चविपुता लिंबाचा रस घालून गॅस कमी करून उकळू द्या.

५.      दुसरीकडे एका तडका पात्रात (कढल्यांत)  एक चमचा साजूक तूप गरम करून त्यात हिंग, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची चे तुकडे घालून तडका फोडणी करा.

६.      वरील तडका फोडणी सूप मध्ये वरून घाला. आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबिर घातल्यास उत्तम स्वाद येईल.

७.      वरील तडका फोडणी सूप मध्ये वरून घाला. आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबिर घातल्यास उत्तम स्वाद येईल.

 

 

 

No comments:

Post a Comment