Monday, 23 January 2023
कुळीथ पिठाच्या पौष्टिक व स्वादिष्ट वड्या
Saturday, 14 January 2023
ताकातील पालेभाज्या
ताकात
बनवल्या जाणाऱ्या पालेभाज्या
पालक, मेथी,करडई,चंदनबटवा,राजगिरा ,मुळ्याचा
पाला,शेपू,माठ,घोळ,चवळी,अंबाडी,भेंडी,हरभरा, आणि चाकवत या पालेभाज्या ताकात बनवतात.
मेथी,भेंडी,पालक,काकडी,पडवळ अशी कोणतीही भाजी घालून ताकातले पिठले सुद्धा छान लागते.
राजस्थानी
कढीला सिंधी कढी असेही म्हणतात. ही कढी बनविण्यासाठी जिरे, मेथीदाणे, सुक्या लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग, बेसन, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडी साखर, गरम पाणी, कोथिंबीर, सोबत अनेक भाज्या गवार, गाजर, वांगी, शेवगा,फरसबी, भेंडी, बटाटा, रताळा, सोयाबीनचे. या सर्व भाज्या घालून ताकाची बेसन लावून कढी बनवतात .
Saturday, 7 January 2023
कषाय (औषधी वनस्पतींचा आरोग्यदायी काढा)
Thursday, 5 January 2023
कुळथाचे (हुलगे) माडगं
लहान मुले, वयोवृद्ध , गरोदर स्त्रीया व बाळंतीणींसाठी उत्तम सात्विक आहार !!!
Wednesday, 4 January 2023
उपवासाच्या पुरणपोळ्या
चार दिवसांपूर्वी इंटरनेटच्या अॅमेझॉन साईट वरून निर्लोनचे नॉनस्टिक तवा आणि फ्राय पॅन COD ने मागवले होते. ते काल मिळाले.
Tuesday, 3 January 2023
आरोग्यदायी पौष्टिक राइस सूप
१. दोन टेबल स्पून तांदुळ (हातसडीचे मिळत असल्यास
अतिउत्तम ),
२. दोन टेबल स्पून साजूक तूप, चवीपुरते मीठ, साखर ,हिंग, जिरे, कढीपत्ता ,हिरवी मिरची, पाणी.
कृती :
१. प्रथम दोन टेबलस्पू तांदूळ स्वच्छ
पाण्याने धुवून घ्य.
२. गॅसवर एका जाड बुडाच्या पातेल्यात एक चमचा
साजूक तूप गरम करून घ्या मग त्यात धुतलेले तांदुळ घालून मंद आंचेवर थोडडेसे परतून
घ्या .
३. तांदुळ सोनेरी रंगाचे झाले की त्यात २
ग्लास पाणी घालून मोठ्या आंचेवर गॅस वर चांगली उकळी येउ द्या. अधून मधून चमच्याने
ढवळत रहा.
४. सूप जरा दाट झाले की त्यात चवीपुरती साखर , मीठ व चविपुता लिंबाचा रस
घालून गॅस कमी करून उकळू द्या.
५. दुसरीकडे एका तडका पात्रात
(कढल्यांत) एक चमचा साजूक तूप गरम करून
त्यात हिंग,
जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची
चे तुकडे घालून तडका फोडणी करा.
६. वरील तडका फोडणी सूप मध्ये वरून घाला.
आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबिर घातल्यास उत्तम स्वाद येईल.
७. वरील तडका फोडणी सूप मध्ये वरून घाला.
आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबिर घातल्यास उत्तम स्वाद येईल.
भाजलेल्या भेंडीची कोशिंबीर किंवा भरीत
भाजलेल्या भेंडीची कोशिंबीर किंवा भरीत
गँसवर
जाळी ठेवून त्यावर भेंड्या ठेवाव्यात. भाजतांना एक काळजी
घ्यावी की भेंड्या खूप काळ्या नको व्हायला. भरीत करताना वांग शिजले हे जसे समजतच
आपल्याला तशीच भेंडी पण समजते शिजल्यावर. भेंड्या थंड झाल्यावर वरच काळं साल काढून कुस्करून
घ्यावी. त्यात घट्ट दही, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ,साखर घालून
कालवून घ्यावे.वरून जिरे-मोहरीची फोडणी
किंवा कच्च तेल घालून एकत्रित कालवून आस्वाद घ्यावा.