ब्रेड रिंग्स
साहित्य : ८-१० ब्रेडचे स्लाईस, अर्धी वाटी तांदूळाची पिठी,एक चमचा लाल
मिरचीचे तिखट,अर्धा चमचा जिरे पूड,अर्धा
चमचा सैंधव मीठ,एक वाटीभर बारीक चिरलेली पालक्चि पाने,चवीनुसार मीठ,एक चमचा लिंबाका रस,तळणीसाठी आवश्यकतेनुसार तेल.
कृती : प्रथम मिक्सरच्या भांड्यात ब्रेड
स्लाईसचे छोटे छोटे तुकडे, तांदूळाची पिठी, लाल मिरचीचे तिखट, जिरे पूड,
सैंधव मीठ, बारीक चिरलेली पालकची पाने,चवीनुसार
मीठ,लिंबाचा रस व थोडेसे घालून फिरवून घ्या व एका बाउलमध्ये
काढून घेऊन त्यात जरुरीनुसार तांदूळाची पीठ व पाणी घालून तेलाच्या हाताने मऊ पीठ
भिजवून व मळून ठेवा.
दहा मिनिटांनी हाताला थोडेसे तेल लावून
मुरलेल्या पिठाचा लिंबाएव्हढा गोळा घ्या आणि गोल छापता आकार करून मध्ये एका बोटाने
आरपार भोक पाडून ती गोल आकाराची टिक्की/रिंग प्लेट मध्ये ठेवा. अशाच प्रकारे
बाकीच्या पिठाच्या रिंग्स बनवून घ्या.
दुसरीकडे गॅसवर एका पॅनमध्ये/कढईत तळणीसाठी तेल
गरम करायला ठेवा. तेल चागले गरम झाले की एकेका वेळी ४-५ रिंग्स पॅन/काढीत
तापलेल्या तेलात सोडून दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून क्रिस्पि झाल्या
की पेपर नॅप्किनवर काढा. अशाच रीतीने उर्वरित रिंग्स सुद्धा तळून घ्या.
टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत या गरम
क्रिस्पि व क्रंची ब्रेड रिंग्स सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment