बेलफळाचे सरबत
बेलफळ
हे अमृत फळ आहेच.मधुमेहात बिघडलेल्या चयापचय क्रियेत मोलाची साथ देतो.पोटाचे तसेच
पूर्ण शरीराची स्वच्छता होते..
उन्हाळ्यात अमृतफळ
बेलाचे सरबत पिण्याचे खूप फायदे होतात.
साहित्य : चार पूर्ण
पिकलेली बेलफळे,दोन वाट्या साखर,एका लिबाचा रस,एक छोटा चमचा वेलची पूड,४-५ केशराच्या काड्या, चिमूटभर मीठ.
कृती : बेलफळे
फोडून चमच्याने बेलफळांच्या आंतला गर काढून घ्या. एका बाऊलमध्ये बेलफळाचा गर घेऊन
त्यात याच्या दुप्पट साखर,एका लिंबाचा रस,चिमूटभर मीठ,वेलची पूड ,केशराच्या काड्या व जरुरीप्रमाणे पाणी आणि बर्फाचे तुकडे घालून
मिक्सरच्या ब्लेंडरमध्ये फिरवून सरबत बनवा.
No comments:
Post a Comment