तांबड्या माठाची भाजी (पालेभाजी)
साहित्य : दोन
जुडड्या तांबड्या माठाची पालेभाजी (ही भाजी ‘चोरटी’ होते म्हणजेच फारच कमी होते म्हणून दोन तरी
जुडड्या घ्याव्यात),दोन मध्यम आकाराचे कांदे,चविपुरती साखर किंवा गूळ , मीठ व लाल तिखट,फोडणीसाठी तेल,मोहरी,हळद व
हिंग
कृती : प्रथम
तांबडा माठ निवडून , स्वच्छ
धुवून व बारीक चिरून घ्या ,कांदाही सोलून व बारीक चिरून घ्या
मग गॅसवर काढीत तेल तापवून घेऊन चांगले तापल्यावर मोहरी टाका व ती तडततडल्यावर
हिंग व हडळ घालून परतून घ्या नंतर माठाची भाजी घालून परतून घ्या व पाणी , चवीपुरते मीठ,लाल तिखट व साखर किंवा गूळ घालून
ताटाने झाकून शिजवून घ्या वरच्या झाकणाच्या ताटात ठुदेसे पाणी घाला म्हणजे खालून व
वरुन दोन्ही बाजूंनी भाजी चांगली शिजेल.
भाजी शिजल्यावर झाकणातील पाणीही भाजीतच
घाला व एक उकळी आल्यावर गॅस बंद करून टाका.
ही लाल भडक रसभरी भाजी पोळी किंवा
ज्वारीच्या भाकरीबरोबर खायला फारच चविष्ट लागते
No comments:
Post a Comment