मेथीचे
आळण
साहित्य : एक जुड्डी मेथी ,एक वाटी मलईचे
दही,चार चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा साखर,तडका फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,अर्धा चमचा मोहरी,चिमूटभर हिंग,अर्धा चमचा हळद,,चवीनुसार
मीठ ,२-३ हिरव्या मिरच्या.
कृती : मेथी निवडून आणि स्वछ करून घ्या आणि बारीक चिरुन ठेवा.
गॅसवर एका एका कढईत तडका फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी घाला व चांगली तडतडू द्या.
मग त्यात चिरलेली मेथी व हिरव्या मिर्ची चे तुकडे टाकून ती भाजी परता.
दुसरीकडे एका भांडयात दही घेऊन ते घुसळून घ्या. व त्यात बेसन टाकून
छान मिक्स करा.(१:३ असे बेसन व दहयाचे प्रमाण घ्या)
मेथीची भाजी छान परतून घेतल्यावर त्यात हळद,
तिखट, आणि मीठ व साखर घालून एखादे मिनिट परतून
घेऊन मग त्यात दही बेसनाचे मिश्रण घालून छान
मिक्स करा.आपल्याला आळण जेवढे घट्ट किव्हा पातळ हवे असेल त्या नुसार पाणी घालावे. पण
आळण कढ़ी पेक्षा जरा घट्टच हवे .
एका लोखंडी काढल्यात टेक गरम करून घ्या व त्यात भरपूर लसूण टाळून तो चांगला
लालसर व क्रिस्पी होउ द्या,मग त्यात सुक्की लाल मिरची, कढ़ीपत्ता, जीरे टाकून याचा तड़का या आळणा वर ओता.
No comments:
Post a Comment