साहित्य : दोन कारली , एक वाटी बेसन किंवा नाचणीचे पीठ , चिमूटभर हिंग , एक चमचा लाल
मिरचीचे तिखट पूड अर्धा चमचा आमचूर पूड , चवीनुसार मीठ , एक चमचा लिंबाचा रस , आवश्यकतेनुसार तळणीसाठी तेल
कृती : कारली चांगली धुवून घेऊन त्याच्या पातळ लांबट गोल चकत्या कापुन घ्या. ह्या चकत्यांना लिंबाचा रस आणि थोडे मीठ लाऊन १५- २० मिनिटे झाकून ठेवा. नंतर ह्या चकत्या पाण्याने २-३ वेळा नीट धुवा.
कृती : कारली चांगली धुवून घेऊन त्याच्या पातळ लांबट गोल चकत्या कापुन घ्या. ह्या चकत्यांना लिंबाचा रस आणि थोडे मीठ लाऊन १५- २० मिनिटे झाकून ठेवा. नंतर ह्या चकत्या पाण्याने २-३ वेळा नीट धुवा.
एका कढई मधे तेल तापवायला ठेवा. तेल
तापेपर्यंत बेसांच्या किंवा नाचणीच्या पीठात हिंग, लाल मिरची पूड, मीठ, आमचूर पूड, पाणी टाकून भज्यांसाठी पीठ तयार करा. तेल
गरम झाले की नाचणीच्या बनवलेल्या पिठात कार्ल्याचे काप बुडवून ही कारला भजी तेलात
सोडावीत. ही भजी दोन्ही बाजुंनी २-३ मिनिटे चांगली तळून घ्या .
ही गरमागरम भजी कोणत्याही पातळ चटणी
बरोबर किंवा साँस बरोबर सर्व्ह करा.
ही भजी डायबेटिस असलेल्या लोकांसाठी छान आहेत.
No comments:
Post a Comment