खदखद्या (शिळा) भात
शिळ्या
भाताचा आम्ही खदखदया (काहीजण खुदखुद्या म्हणतात) भात करतो. साजूक तुपात जिर्याची
फोडणी करायची, त्यात कढीपत्ता टाकायचा, चवीनुसार
लाल सुक्या मिरच्या टाकायच्या. लसूण आणि आल्याचे तुकडे, किंचित
मेथीदाणे आवडत असल्यास. मग त्यात भात टाकून ताक आणि थोडं पाणी टाकायचं आणि मेतकूट
व मीठ घालायचं.आवडत असल्यास ओवा आणि थोडी
मिरपूड पण घाललेली चालते.
थोड्या
वेळाने भात खदखदला की गॅस बंद करून वरून बारीक
चिरलेली कोथिंबीर घालायची. (आवड असल्यास चवीपुरती साखर घालावी)
No comments:
Post a Comment