Search This Blog

Saturday, 26 August 2017

झटपट आळूवड्या



साहित्य : ५-६ वड्यांच्या आळूची मोठी न खाजणारी आळूची पाने,दोन वाट्या बेसन पीठ,चवीनुसार लाल मिरचीचे तिखट,मीठ व चिंचेचा कोळ,एक छोटा चमचा हिंग,एक छोटा चमचा हळद व आळूवड्या शॅलो फ्राय करण्यासाठी लागेल तसे तेल.

कृती : झटपट आळूवडी करायची आसल्यास आळूची पाने बारीक बारीक (देठासकट) चिरुन त्यात बेसन पीठ,चवीनुसार लाल मिरचीचे तिखट,मीठ,चिंचेचा कोळ,चिमूटभर हिंग व हळद घालून वड्यांचे पीठ भिजवा,चव बघा व मगच त्या पिठाचे उंडे करून इडलीपात्रात किंवा कुकरमधून ते उंडे उकडून घ्या.थंड झाल्यावर उंड्याच्या वड्या कापून घ्या. नंतर त्या डिप फ्राय किंवा शॅलो फ्राय करा. मस्त लागतात अश्या आळूवड्या चवीला..

No comments:

Post a Comment